vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी इच्छुकांनी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत https://sports.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे

इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांमध्ये सहभागी खेळाडू व व्यक्तींनी क्रीडा विभागाच्या ‘स्पोर्ट्स डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. याअंतर्गत क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

पात्र खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय सन्मानाची संधी उपलब्ध करून देणे, हा या पुरस्कारांचा व्यापक उद्देश आहे

०००००

संबंधित पोस्ट

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

जिल्ह्यात ८ ते २५ एप्रिलदरम्यान ‘अमृत परिवार सर्वेक्षण अभियान’ 

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके

२४ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय बुवाबाजीविरोधी महिला परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta