vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी

समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी

अमरावती प्रतिनिधी समान नागरी कायद्याबाबत (युसीसी) विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे आयोजन रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती (समक्ष) व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय (व्ही.सी. द्वारे) येथे करण्यात आले आहे.

या अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्यासाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत, वाशिम जिल्ह्यासाठी सकाळी १२.३० ते दुपारी १.३० या वेळेत, बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी २.३० ते दुपारी ३.३० या वेळेत, यवतमाळ जिल्ह्यासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी ५.३० ते सायं. ६.३० या वेळेत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धारित दिवशी,निर्धारित वेळेपुर्वी १ तास आधी सुनावणीकामी समक्ष उपस्थित राहता येईल. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील उपस्थितांची सुनावणी समितीसमोर समक्ष घेण्यात येईल व संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरीकांची सुनावणी व्हि.सी.व्दारे घेण्यात येईल.

तसेच, ज्या नागरीकांना केवळ ऑनलाईन पध्दतीने आपले मत सादर करावयाचे आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या https://ucc.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर ३७ मुद्दयांची माहिती देता येईल. असे अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी कळविले आहे.

–००—

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनकल्याणाचा सेतू; ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून शासकीय योजना थेट पोहोचणार घराघरात जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे आणि शासकीय यंत्रणांना जिल्हा माहिती कार्यालयाचे सक्रिय सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन ! समीर यांचे निधन, हा व्यवस्थेने घेतलेला बळीच ! – सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ

जलसंवर्धन ही काळाची गरज; युवकांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील चेन्नई इथे 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण

vishwatmaklokswamivarta