vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवा; बचाव यंत्रणा सक्षम करा- पालकमंत्री भरत गोगावले,धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावा; बीचवर जीवरक्षक, प्रशिक्षित आपदा मित्र आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करा

समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवा; बचाव यंत्रणा सक्षम करा- पालकमंत्री भरत गोगावले,धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावा; बीचवर जीवरक्षक, प्रशिक्षित आपदा मित्र आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करा

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस व होमगार्डची गस्त वाढवावी. धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तेथे स्पष्ट सूचना फलक लावावेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी आपदा मित्रांची मदत घ्यावी, त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण द्यावे आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्ह्यातील सागरी किनारा सुरक्षा, व्यवस्थापन आणि उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.गोगावले म्हणाले, जिल्ह्यात एकूण 31 समुद्रकिनारे असून, त्यापैकी 28 किनारे सुरू असून 11 समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात पर्यटन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावा. तसेच, समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी पर्यटन मित्र नियुक्त करण्याबाबतही प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

समुद्रकिनाऱ्यांवरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणांची ओळख करून तेथे आवश्यक सूचना फलक लावावेत. गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि होमगार्डची गस्त वाढवून पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. आपदा मित्रांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करून घ्यावे. बचावासाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामग्री उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले.

बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

00000000

संबंधित पोस्ट

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर भेट

जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटीचा प्रश्न थेट मुंबईत; उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर दखल ,परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक नितीन माइंड यांच्याकडून तक्रारीची दखल बंद बससेवा व प्रवाशांच्या तक्रारींची चौकशी होणार निवेदन जालना विभागाकडे वर्ग करून कार्यवाहीचा अहवाल मागविला…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील साधणार