vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियानांतर्गत गुणवंत विद्यार्थी प्रथमेश कल्याणकर यांचा गौरव, छत्रपती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीमुळे परदेशात उच्च शिक्षणाची संधी

सेवा संकल्प अभियानांतर्गत गुणवंत विद्यार्थी प्रथमेश कल्याणकर यांचा गौरव, छत्रपती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीमुळे परदेशात उच्च शिक्षणाची संधी

 

 सांगली, प्रतिनिधी: सेवा संकल्प अभियानांतर्गत सांगली येथील गुणवंत विद्यार्थी प्रथमेश कल्याणकर यांची छत्रपती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. समतादूत संयोगिता हेरकळ यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रथमेश यांचे कौतुक केले तसेच त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 राज्यातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत छत्रपती राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विविध निकष व निवड प्रक्रियेतून प्रथमेश कल्याणकर यांची निवड झाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे प्रथमेश यांना परदेशात उच्च शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ज्ञान व कौशल्याची उंची गाठण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 यावेळी समतादूत संयोगिता हेरकळ यांनी प्रथमेश यांच्या यशाचे कौतुक करताना, “परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना यशाची नवी शिखरे सर करण्यास बळ देतो,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

00000

संबंधित पोस्ट

रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन तातडीने पूर्ण करावे– मंत्री आदिती तटकरे

राज्यातील १३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू 

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा