vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद की चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी सचखंड पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम

“हिंद की चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी सचखंड पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम

नांदेड प्रतिनिधी :- श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त “हिंद की चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने आज नांदेड येथील सचखंड पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच भारताचा नकाशा करून हिंद दी चादर या गीताचे गायन देखील यावेळी केले आणि शहिदांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, शाळेच्या प्राचार्य अनिल कौर, चत्तर सिंग टंक, रणदीप सिंग पिरंगे, करणपाल सिंग लोणी वाले, भगेंद्रसिंग फौजी आदीची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी शाळा स्तरावर विविध स्पर्धा व उपक्रम राबवून “हिंद की चादर” कार्यक्रम व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरी, विविध स्पर्धा, भाषण, रांगोळी आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याअनुषंगाने आज नांदेड येथील सचखंड पब्लिक स्कूल येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नांदेड येथे होणाऱ्या “हिंद की चादर” कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच हा कार्यक्रम समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज सचखंड पब्लिक स्कूल शाळेच्या प्राचार्या अनिल कौर खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या संपूर्ण स्टाफच्या मदतीने विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा साकारला होता.गुरुबचन सिंग शिलेदार आयटीआय खालसाचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले.00000

संबंधित पोस्ट

साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्तमहिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

नूतन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला

जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षेचे गुणपत्रक,प्रमाणपत्र परीक्षार्थीने हस्तगत करण्याचे आवाहन

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव- जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta