vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई*निंभा येथे पहाटे ५.१५ वाजता कारवाई*वाळूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई*निंभा येथे पहाटे ५.१५ वाजता कारवाई*वाळूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती, प्रतिनिधी: भातकुली येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई केली आहे. निंभा येथे रविवारी, दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून वाळूसह अंदाजे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी महेश घाटोळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गेल्या २२ दिवसांच्या कालावधीत भातकुली महसूल विभागाने ही पाचवी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली महसूल विभाग अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवत आहे. या कारवाईत तहसीलदार अक्षय मांडवे, मंडळ अधिकारी संतोष धुर्वे, ग्राम महसूल अधिकारी संतोषसिंग गिल व ग्राम महसूल अधिकारी मनोज बेले यांनी सहभाग नोंदविला

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाची मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात–केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• चैत्यभूमी परिसरासाठी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश• १ डिसेंबरपासून मूलभूत सुविधा सुरू करण्याची सूचना

vishwatmaklokswamivarta

जलयुक्त शिवार २.० आढावा बैठकजलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुतळा समितीची’ आढावा बैठक संपन्न

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचेजिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे