vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

पेन्शनधारकांना घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा**हयातीच्या दाखल्यासाठी बँकेत जाण्याची धावपळ कमी होणार; पोस्टमनमार्फत घरपोच सेवा**बोटांचे ठसे उमटत नसले तरी चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरण; ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम*

*पेन्शनधारकांना घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा**हयातीच्या दाखल्यासाठी बँकेत जाण्याची धावपळ कमी होणार; पोस्टमनमार्फत घरपोच सेवा**बोटांचे ठसे उमटत नसले तरी चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरण; ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम*

गडचिरोली, प्रतिनिधी) : पेन्शन नियमित सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करताना ज्येष्ठ नागरिकांना होणारी धावपळ आता कमी होणार आहे. भारतीय टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) माध्यमातून पेन्शनधारकांना घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला (Digital Life Certificate) सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोस्टमनमार्फत घरपोच सेवा मिळणार असल्याने विशेषतः वृद्ध, आजारी, दिव्यांग तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ललित सदावर्ती यांनी दिली.

निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पेन्शन नियमित सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी निर्धारित कालावधीत हयातीचा दाखला सादर करावा लागतो. यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांना बँक किंवा संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. लांब रांगा, प्रवासाचा त्रास आणि वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अडचणी लक्षात घेता टपाल विभागाची ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सेवेंतर्गत पेन्शनधारकांना पोस्टमनच्या माध्यमातून घरीच डिजिटल हयातीचा दाखला सादर करता येईल. तसेच जवळच्या टपाल कार्यालयात जाऊनही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

*बोटांचे ठसे उमटत नसले तरी चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरण*वाढत्या वयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नाहीत. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करताना अडचणी निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन चेहऱ्याच्या ओळखीद्वारे (Face Authentication) डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून चेहऱ्याची ओळख पटवून ही प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे हयातीचा दाखला सादर करण्यात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागात वसलेली आहेत. अशा भागांतील ज्येष्ठ नागरिकांना बँक किंवा संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. टपाल विभागाच्या घरपोच सुविधेमुळे पेन्शनधारकांचा प्रवासाचा त्रास कमी होऊन हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.*३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम; लाभ घेण्याचे आवाहन*पेन्शनधारकांना डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागामार्फत १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘राष्ट्रव्यापी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहीम ५.०’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत ही सुविधा पोहोचविणे, त्यांना डिजिटल पद्धतीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आणि हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पेन्शनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला हयातीचा दाखला निर्धारित मुदतीत सादर करावा. विशेषतः वृद्ध, आजारी आणि दुर्गम भागातील पेन्शनधारकांनी घरपोच सेवेचा लाभ घ्यावा. या सुविधेबाबत अधिक माहिती आणि घरपोच सेवेसाठी १५५२९९ किंवा ९२१८३०२७०१ या ग्राहक सेवा क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ललित सदावर्ती यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

🌧️ रायगड हवामान अपडेट | IMD ५ दिवसांचा अंदाज जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता….

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बारामतीतील निवासस्थानी शोकसंवेदना व्यक्त केल्या

vishwatmaklokswamivarta

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन