vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ एअर शोचे २६ नोव्हेंबरला साताऱ्यात आयोजन; महाराष्ट्रातील पहिलाच एअर शो

भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ एअर शोचे २६ नोव्हेंबरला साताऱ्यात आयोजन; महाराष्ट्रातील पहिलाच एअर शो

सातारा, प्रतिनिधी: ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या शौर्यशाली लष्करी परंपरेच्या स्मरणार्थ सातारा जिल्ह्याच्या पर्यटन संवर्धनासाठी व लष्करी वारशाचा सन्मान करण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचा एअर शो व ‘एअर वॉरियर ड्रिल टीम’चे सादरीकरण गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी 11 ते 1 वा. साताऱ्यात होणार आहे. २६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्याच्या स्मरणदिनीच हा कार्यक्रम आयोजित होत आहे.
महाराष्ट्रातील हा पहिलाच एअर शो देशातील पहिल्या सैनिक स्कूलच्या, म्हणजेच सैनिक स्कूल, सातारा येथील फुटबॉल मैदानावर दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी 11 ते 1 वा. होणार असून, श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियम येथे सायं 5 ते 7 या वेळेत वायुदलाचे बँड पथक व सैन्य दलाचे संचलन होईल. यातून विद्यार्थी व युवकांना वायुसेनेची शिस्त व कौशल्य अनुभवता येईल, संरक्षण दलातील करिअरसाठी प्रेरणा मिळेल आणि जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल.
या कार्यक्रमास सर्व नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक व देशप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
000

संबंधित पोस्ट

वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह बचतगट,भायमाला,कामार्लेयांची ध्येयाकडे वाटचाल

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

फलटणमध्ये शेतकरी व ग्रामपंचायतीच्या – १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानाला उद्योग जगताचाही सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक नागरिकाने जलव्यवस्थापन करणे काळाची गरज- आमदार डॉ. सुरेश खाडे- अभियान केवळ कागदावर न राहता आपल्या कृतीत उतरवा- पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन