vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राखी–गुरवळ्यात शेतकऱ्यांशी संवाद, उपोषण मागे घेण्याचे अनिरुद्ध पालकर यांचे आवाहन*

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राखी–गुरवळ्यात शेतकऱ्यांशी संवाद, उपोषण मागे घेण्याचे अनिरुद्ध पालकर यांचे आवाहन*

गडचिरोली प्रतिनिधी— गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठीची भूसंपादन कार्यवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पालकर यांनी राखी–गुरवळा येथील उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकरी आणि ग्रामस्थांशी काल संवाद साधला.

प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंबंधीचा १२ मे २०२६ रोजीचा शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी गुरवळा–राखी–हिरापूर–शिरपूर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ पासून राखी–गुरवळा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंतची भूसंपादन कार्यवाही थांबवण्यात आली आहे, असे पालकर यांनी ग्रामस्थांना सांगितले. बळजबरीने जमीन घेऊन प्रकल्प राबवण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्देश नसल्याचेही पालकर यांनी स्पष्ट केले.

 चर्चेतून इतर मार्ग निघू शकतो आणि न पटल्यास पुन्हा आंदोलन करण्याच्या शेतकऱ्यांचा हक्क अबाधित असल्याचेही त्यांनी सांगितले. *विमानतळासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध*राखी, गुरवळा, हिरापूर आणि शिरपूर परिसरातील जमीन सुपीक व बारमाही बागायती आहे. परिसरातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून, शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे विमानतळासाठी जमीन देण्यास आपला विरोध दर्शविण्यासाठी साखळी उपोषण करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या वेळी तहसीलदार सागर कांबळे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज येथे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही…

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. 

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन