vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

से.11 कोपरखैरणे नमुंमपा शाळेस माजी महापौर कै.तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय नामकरण संपन्न

से.11 कोपरखैरणे नमुंमपा शाळेस माजी महापौर कै.तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय नामकरण संपन्न

 

   नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 11 येथील नमुंमपा सी.बी.एस.ई. शाळा क्र.94 या शाळेस माजी महापौर कै.तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय असा नामकरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी माजी खासदार श्री.संजीव नाईक, माजी आमदार श्री.संदीप नाईक, उपमहापौर श्री.दशरथ भगत, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृहनेते तथा स्थानिक नगरसेवक श्री.सागर नाईक, माजी महापौर नगरसेवक श्री.जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.चंद्रभागा मोरे, पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, स्थानिक नगरसेवक श्री.मुनावर पटेल, श्रीम.वैष्णवी नाईक, श्रीम.अदिती नाईक, श्री.संदीप म्हात्रे, श्री.डी.आर.पाटील, श्री.शिरीष पाटील, श्रीम.मिनाक्षी पाटील, माजी नगरसेवक श्री.लिलाधर नाईक, श्री.शंकर मोरे आणि श्री.वैभव नाईक तसेच परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे, कोपरखैरणे विभागाच्या सहा.आयुक्त श्रीम.साधना पाटील, शिक्षणाधिकारी श्री.अशोक कडुस, जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र कोंडे, उपअभियंता श्री. संतोष शिकतोडे व इतर मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका श्रीम.वैष्णवी वैभव नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

            सभागृहनेते तथा स्थानिक नगरसेवक श्री. सागर नाईक यांनी मांडलेल्या नामकरण प्रस्तावानुसार महापालिका सर्वसाधारण सभेच्या मंजूरीने सदर नामकरण संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या जडणघडणीत अगदी सुरूवातीपासून माजी महापौर श्री.तुकाराम नाईक यांचे अत्यंत मौलिक योगदान राहिले आहे. महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून 1998-99 मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत सन 1999-2000 मध्ये नवी मुंबई शहर विकासाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषवित त्यांनी नवी मुंबईमध्ये राज्यातील सर्व शहरांच्या महापौरांचे राज्यस्तरीय अधिवेशन भरविले होते. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कौपरखैरणे सेक्टर 11 येथील शाळेला कै.तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय असे नामकरण करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आय आय टी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे १० तास चौकशी केली. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुरजींचे सर्वोच्च बलिदान मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ – राज्यपाल जिष्णु देव वर्मा नवी मुंबईत ‘श्री गुरु तेग बहादुरजी यांचा वारसा’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांची सामुहिक जबाबदारी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

दिवाळीच्या आनंदात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत शासनाची पावले;**वनमंत्री गणेश नाईक यांचा शहापूर दौरा ठरला आश्वासक*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ चा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ