vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी**नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट, संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

*समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी**नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट, संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात दि. २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीत संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

समान नागरी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाराष्ट्रात महसूल विभागनिहाय जनसुनावणीसाठी भेट देणार आहे. या जनसुनावणीच्या माध्यमातून विवाह, घटस्फोट, सहजीवन (लिव्ह-इन) नातेसंबंध, भरण-पोषण, पालकत्व, वारसाहक्क व उत्तराधिकारी हक्क या विषयांबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.

कोकण महसूल विभागातील जनसुनावणीचे आयोजन दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे.सदर सुनावनीचे नियोजन जिल्हा निहाय करण्यात आले आहे. यात दि. २१ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर सकाळी ११ ते दुपारी १२, मुंबई उपनगर दुपारी १२.३० ते १.३०, पालघर दुपारी ३ ते ४ आणि सिंधुदुर्ग दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत जनसुनावणी होईल. तसेच दि. २२ नोव्हेंबर रोजी ठाणे सकाळी ११ ते दुपारी १२, रायगड दुपारी १२.३० ते १.३० आणि रत्नागिरी दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल.

या जनसुनावणीसाठी नागरिकांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे.सदर समितीचे सदस्य हे सुनावणी कामी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही समिती पुढे प्रत्यक्ष होईल. तसेच संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही व्हिडियो काॅन्फरसिंगद्वारे घेण्यात येणार आहे.

तसेच ज्या नागरिकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने आपली मते सादर करावयाचे आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टल⁠ वर ३७ मुद्यांची माहिती देता येईल, असे ही विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगिलते.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली पिकस्थितीची पाहणी

vishwatmaklokswamivarta

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा शुभारंभ; रायगडमध्ये जे.एस.एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय उपक्रमास प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षण व रोजगाराच्या संधी विस्तारण्यासाठी योजनांना गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे इतर मागासवर्ग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा

कृषी पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या संधी- पणन मंत्री जयकुमार रावल‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’चे पणनमंत्री रावल यांच्या हस्ते दिमाखदार उदघाटन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्रमिक हो.. घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक