vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अमरावतीत १७ नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’जाधव गियर्स’ कंपनीतील १३० जागांसाठी भरती

अमरावतीत १७ नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’जाधव गियर्स’ कंपनीतील १३० जागांसाठी भरती

अमरावती, प्रतिनिधी): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ‘ जाधव गियर्स,प्रिसीजन मॅपिंग,जिनस कंपनीमध्ये उमेदवारांना १३० पदांची संधी मिळणार आहे

       नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी या रोजगार मेळाव्याद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या मेळाव्यात जाधव गियर्स,प्रिसीजन मॅपिंग,जिनस कंपनीमध्ये प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतील. मुलाखतीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी दिली जाणार आहे

या भरती प्रक्रियेद्वारे विविध १३० पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून एम.बी.ए. पदवी धारकाला प्राधान्य असेल किंवा उमेदवार पदव्युत्तर पदवी धारक असावा. उमेदवाराकडे उत्तम संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी १७ नोव्हेंबर रोजी स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईझ फोटो आणि सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह (व छायांकित प्रतींसह) केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत काही अडचण किंवा अधिक माहिती माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ / ८३०८९५६२३६ / ७६२०५६०१२५ / ८६०५६५४०२५ वर तसेच amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

गोदाम बांधकाम व मिनी ऑईल मिलसाठी २२ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

खाजगी नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; बुलढाण्यात 13 एप्रिलला प्लेसमेंट ड्राइव्ह

परतवाड्यात 16 मे रोजी सेंट्रल बँकेचा ‘एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम’; उद्योजकांना जागेवरच मिळणार कर्ज मंजुरी पत्र

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta