vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी जनजातीय गौरव सेवा सप्ताहात उपक्रम आखावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी जनजातीय गौरव सेवा सप्ताहात उपक्रम आखावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, प्रतिनिधी : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिन, तर 11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026 साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत आदिवासी समाजाच्या हक्कांची जाणीव, त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि सर्वांगीण विकासाला चालना देणारे उपक्रम आखावेत. या माध्यमातून आदिवासी बांधवांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करणाऱ्या उपक्रमांवर विशेष भर द्यावा. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. शासकीय दाखले, विविध प्रमाणपत्रे, आरोग्य सेवा, शिक्षणविषयक सुविधा तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून शासकीय सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख कराव्यात. आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, त्यांच्या विकासाच्या संधी वाढविणे आणि त्यांना मुख्य विकासप्रवाहात सन्मानाने सहभागी होण्यासाठी सक्षम करणे, हा या सप्ताहाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असावा, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सूचित केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

🏆 २१ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ संपन्न

vishwatmaklokswamivarta

महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ**रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार*

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान- कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागात वादळी पावसाची शक्यता.. हवामान खात्याचा अंदाज

वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको – मंत्री हसन मुश्रीफ