vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उबाळे कुटुंबास शासन स्तरावर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे*भास्कर आबा दानवे यांच्याकडून उबाळे

उबाळे कुटुंबास शासन स्तरावर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे*भास्कर आबा दानवे यांच्याकडून उबाळे कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत*

जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी जालना तालुक्यातील मौजे नंदापूर येथील श्री. किसन निळूबा उबाळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी उबाळे कुटुंबीयांची भेट घेऊन आगीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उबाळे यांच्या घराला आग लागली होती. घराच्या पहिल्या मजल्यावर कापसाचा साठा होता. घराचे लाकडी माळवद व दुमजली बांधकाम असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पाठ्यपुस्तके,कापूस, धान्य तसेच इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत उबाळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, राहते घरही उद्ध्वस्त झाल्याने सध्या या कुटुंबाला दुसऱ्याच्या घरी आश्रय घ्यावा लागत आहे.

यावेळी भास्कर आबा दानवे यांनी उबाळे कुटुंबीयांशी संवाद साधून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे कुटुंबावर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. अशा कठीण प्रसंगी केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीचा हात देणे ही सामाजिक बांधिलकी आहे, या भावनेतून भास्कर आबा दानवे यांनी उबाळे कुटुंबाला एक लाख रुपयांची रोख आर्थिक मदत दिली व त्यांच्या कुटुंबातील मुलाना शालेय साहित्य देऊन त्यांना धीर दिला .तसेच, घटनास्थळाची पाहणी करताना जालना तहसीलदार तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची आणि शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली.

यासंदर्भात बोलताना भास्कर आबा दानवे म्हणाले की, “उबाळे कुटुंबावर आलेले संकट अत्यंत दुर्दैवी असून, या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शासन स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहे असे आश्वासन दिले.

याप्रसंगी समवेत भाजपा जिल्हा सरचिटणीस वसंत शिंदे,सुनिल पवार, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश केरकळ,भाजपा ग्रामिण तालुकाध्यक्ष संजय डोंगरे,विष्णु डोंगरे,गोवर्धन कोल्हे,कैलाश उबाळे,मुकेश चव्हाण गजानन खरात, सरपंच दत्तू कुरधणे,काकासाहेब घुले,पांडुरंग क्षीरसागर, राजाराम राजे जाधव,रवि कायंदे,सतीश जारे, ,प्रल्हाद ढवळे,शिवाजी ढगे,शिवाजी गायकवाड,नागेश अंभोरे,प्रशांत उबाळे,नवनाथ म्हस्के,नितीन कायंदे,विनायक पवार,करण निकाळजे,विकास कदम,यश खरात,ज्ञानेश्वर उबाळे,लिंबाजी शिंदे,विलास टेकाळे,ऊतम खरात,सुदर्शन उबाळे,लक्ष्मण शेळके,रवींद्र खरात,सखाराम चव्हाण,गोवर्धन उबाळे,कैलाश सोळुंके,सुखदेव महाराज चांदगुडे,रामदास अण्णा खरात,ऋषि कुरधणे,प्रतिक उबाळे,दीपक उबाळे,रमेश चव्हाण,अशोक उबाळे,छत्रभूज उबाळे,काशीनाथ उबाळे,अशोक उबाळे,शिवाजी वानखेडे,महेश वाघ,अमोल उबाळे,रामेश्वर उबाळे,राजेंद्र चांदगुडे,बाबासाहेब चव्हाण,गणपत कुरधणे,रामु शिंदे तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई

विशेष लेख….पनवेल महानगरपालिका राज्यात अव्वल : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी*

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!**वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;*मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश..

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी पुढाकार; टीबी रुग्णाला सहा महिन्यांसाठी दत्तक

नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta