vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्जमतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांतविभागीय आयुक्तांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी; अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्जमतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांतविभागीय आयुक्तांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी; अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी उद्या, मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

 

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी होणार आहे. विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी आज मतमोजणी केंद्राला भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलांची मांडणी, स्ट्राँग रूम, मतपेट्यांची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतमोजणीच्या फेऱ्या, निकाल संकलन व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

 

मतमोजणीसाठी 70 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, प्राथमिक मतमोजणीच्या 13 फेऱ्यांचे नियोजन आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व दोन सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक सात टेबलांवर एका सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतपत्रिकांचे वर्गीकरण, वैध व अवैध मतांचा निर्णय, पसंतीक्रमानुसार मतांची नोंद तसेच निकालपत्रकांची पडताळणी करताना विशेष दक्षता घ्यावी. मतमोजणीदरम्यान कोणतीही शंका अथवा अडचण उद्भवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीद्वारे देखरेख, प्रवेश नियंत्रण व आवश्यक मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती देण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.

 

यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच टेबलनिहाय कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सर्वांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी दिले.

 

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू – राज्यमंत्री योगेश कदम खेड तालुक्यातील जामगे येथे‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत माजी सैनिक मेळावा उत्साहा

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ठाण्यात जिल्हा सल्लागार व आढावा समितीची बैठक संपन्न,वार्षिक कर्ज योजनेअंतर्गत ९५ हजार ७२४ कोटींचे कर्जवाटप!खाजगी बँकांच्या असमाधानकारक कामगिरीवर जिल्हाधिकाऱ्यांची तीव्र नाराजी२१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विशेष अभियानाची घोषणा

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित सकाळ-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस घ्यावेत..

विधानपरिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज; २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta