vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

कॉफी विथ कलेक्टर उपक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद**अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे राहा; तरुण पिढी देशाचे भविष्य: जिल्हाधिकारी संतोष पाटील*

*कॉफी विथ कलेक्टर उपक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद**अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे राहा; तरुण पिढी देशाचे भविष्य: जिल्हाधिकारी संतोष पाटील*

 

सातारा, प्रतिनिधी आजचे विद्यार्थी अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी आहेत. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे त्यांनी आतापासूनच निश्चित केले आहे. पालकांनी त्यांच्या या स्वप्नांना पाठिंबा द्यावा आणि शिक्षकांनीही त्यांच्या तयारीसाठी आतापासूनच मार्गदर्शन करावे. लक्षात ठेवा, यश किंवा अपयश हे अंतिम नसते. जर तुम्ही अपयशी ठरलात, तर त्याचा अर्थ आयुष्य संपले असा होत नाही. अपयशातून शिका आणि नव्या दमाने पुन्हा उभे राहा. आजची तरुण पिढी हे देशाचे भविष्य असून तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, तिचा योग्य वापर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ कलेक्टर’ या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी थेट आणि मोकळेपणाने संवाद साधला.

 

संबंधित पोस्ट

दुष्काळात शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली नको; खासगी सावकारांच्या छळाविरुद्ध कठोर कारवाई करा!-पालकमंत्री जयकुमार रावल पाणी, चारा, रोजगार आणि अन्नधान्यासाठी गावनिहाय नियोजन करा; दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यास सर्वोच्च प्राधान्य

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र या अभिनव प्रकल्पाचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले राष्ट्रीय परिषदेत प्रभावी सादरीकरण

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात.

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे हिवतापावर मोठे नियंत्रण; पॉझिटिव्हिटी दर, API आणि मृत्यूसंख्येत लक्षणीय घट* 

vishwatmaklokswamivarta