vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे तंबाखूमुक्तीसाठी पाऊल; ‘कोटपा’ कायद्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न*

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे तंबाखूमुक्तीसाठी पाऊल; ‘कोटपा’ कायद्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न*

कोल्हापूर प्रतिनिधी-युवकांमध्ये तंबाखू सेवनास प्रतिबंध करणे,तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘तंबाखू मुक्त युवा अभियान ४.०’ राबविण्यात येत आहे. या ६० दिवसीय देशव्यापी अभियानाचा शुभारंभ नुकताच नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रभावी उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील पोलीस विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी ‘कोटपा २००३’ (COTPA 2003 – सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायदा) या कायद्याचे विशेष क्षमता बांधणी प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

                 प्रारंभी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे (NTCP) जिल्हा सल्लागार डॉ.व्ही. ए. आरळेकर यांनी जिल्ह्यातील तंबाखू मुक्ती मोहिमेचा आढावा घेतला. तसेच पोलीस विभागा साठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आणि अभियानाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

या प्रशिक्षण वर्गामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छ. संभाजी नगरचे प्रतिनिधी अनिल गुंजे यांनी सादरीकरणाच्या (Presentation) माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘कोटपा २००३’ कायद्यातील विविध कलमे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास असलेली बंदी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर असलेले निर्बंध आणि या कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कशी कारवाई करावी, याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. तंबाखू मुक्त युवा अभियान ४.०’ यशस्वी करण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले . याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) प्रमुख,पोलीस निरीक्षक (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (PSI) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  00000

संबंधित पोस्ट

रेणापूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची नियुक्ती… 👏🏻🎉

तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा : महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश