vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

चिखली तालुक्यातील ५० हजार ५८३ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभई-पंचनामा पोर्टलद्वारे अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू; बँक खाते आधार संलग्न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

चिखली तालुक्यातील ५० हजार ५८३ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभई-पंचनामा पोर्टलद्वारे अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू; बँक खाते आधार संलग्न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ५० हजार ५८३ शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. ई-पंचनामा पोर्टलवरील प्राप्त माहितीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयामार्फत करण्यात येत आहे

चिखली तालुक्यातील शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलनुसार एकूण ९६ हजार २२६ शेतकऱ्यांची माहिती प्राप्त झाली आहे. यापैकी ८० हजार २५५ शेतकऱ्यांना सानुग्रह निधी वितरणासाठी ई-पंचनामा पोर्टलवर गावनिहाय पात्र करण्यात आले आहे. प्राप्त माहितीमध्ये २६ हजार २८५ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी वारंवार नोंदविले गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात एकमेव फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५३ हजार ९७० आहे.

या ५३ हजार ९७० शेतकऱ्यांपैकी ई-पंचनामा पोर्टलवर पात्र ठरलेल्या ५० हजार ५८३ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान प्राप्त झाले आहे. तर १ हजार ११७ शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्याशी संबंधित तांत्रिक कारणांमुळे रिजेक्ट झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार संलग्नता (सीडिंग), मॅपिंग आणि डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय १ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू असून ८३८ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे.

दरम्यान १५ हजार ९७१ शेतकऱ्यांच्या प्रकरणांमध्ये सामाईक खातेदार, मृत खातेदार तसेच कालावधीत झालेल्या शेतीच्या खरेदी-विक्रीमुळे मालकी हक्कात बदल झालेला आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित खातेदारांची संमती प्राप्त होईपर्यंत ई-पंचनामा पोर्टलवर ही प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत,अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुलांचे बांधकाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत

दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड–पटना–नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाडीच्या तीन फेऱ्या चालविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta