vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जायकवाडी कालव्यातून पाण्याचे आवर्तन; लाभक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश

जायकवाडी कालव्यातून पाण्याचे आवर्तन; लाभक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य डावा, उजवा कालवा व त्यांच्या वितरीका, लघु वितरीकांद्वारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामा २०२६-२७ साठी आवर्तन सोडण्यात आले आहे.या कालवा प्रणालीच्या लाभ क्षेत्राट व आपेगाव उच्च पातळी बंधारा, हिरडपुरी उच्च पातळी बंधारा या क्षेत्रात दि.११ जानेवारी २०२७ पर्यंत कलम १६३(१) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्याअन्वये सिंचन आवर्तनादरम्यान कालव्यांमधुन होणारा अनधिकृत पाणी उपसा, कालव्याच्या नियंत्रण संचनेत हस्तक्षेप, कालवा व संबंधित बांधकामांचे नुकसान, पाणी वाटपाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे इ. कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षणऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

vishwatmaklokswamivarta

जात पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

vishwatmaklokswamivarta