vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन खाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन खाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच STEP अंतर्गत अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा दि. १२ मे २०२६ रोजी, मंगळवारी सकाळी ९.३० वाजता श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, पाळणा घर, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.सदर मेळाव्यात वैभव एंटरप्रायजेस अंतर्गत अंकित पल्प मानसार, विशल्य प्रिं्टमन नागपूर, संविजय इन्फ्रास्टक्चर बुटीबोरी, अपेक्स क्नीव्स नागपूर, असरोफॅब मशिनरीज नागपूर तसेच विराज प्रोफाइल मुंबई आदी नामांकित उद्योग समूह सहभागी होणार असून त्यांनी विविध रिक्त पदांची अधिसूचना दिली आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार असून प्राथमिक निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच काही उमेदवारांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१० वी, १२ वी, आयटीआय, पदवीधर तसेच STEP अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले पुरुष व महिला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदांसाठी मुलाखत देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.

रोजगार इच्छुकांनी स्वखर्चाने उपस्थित राहून नाव नोंदणी करून कंपन्यांच्या प्रतिनिधींशी मुलाखत द्यावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ग. प्र. बिटोडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक (०७२६२) २४२३४२ वर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

खाजगी नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; बुलढाण्यात 13 एप्रिलला प्लेसमेंट ड्राइव्ह

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), यांच्याकडुन  मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण 

विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्य पुरविण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे· फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६

अमरावती विभागात 200 तरुणांना ‘टूरिस्ट गाइड’ बनण्याची संधी;पर्यटन संचालनालयातर्फे 7 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण