vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

 

लातूर, प्रतिनिधी): भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील नवयुवक आणि नवयुवतींसाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात 14 ते 23 डिसेंबर, 2026 या कालावधीत ‘एसएसबी कोर्स क्र. 68’ आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कालावधीत निवड झालेल्या उमेदवारांना शासनामार्फत मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा दिली जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 8 डिसेंबर, 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेतस्थळावरून किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून एसएसबी-68 कोर्सचे प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्णपणे भरून सोबत आणणे आवश्यक आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी 13 डिसेंबर, 2026 रोजी सकाळी 10 वाजता नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रावर हजर राहावे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार यूपीएससीची कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए) उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. याशिवाय एनसीसी स्पेशल एन्ट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम (विद्यापीठ प्रवेश प्रणाली) अंतर्गत एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असलेले किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही या प्रशिक्षणासाठी पात्र राहतील.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्याशी कार्यालयीन वेळेत ई-मेल training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 वर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी. 

3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांना 15 दिवसीय जनगणना प्रशिक्षण**नागरिक घरबसल्या स्वत:ही करू शकतात ऑनलाईन स्व-नोंदणी* 

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत प्रवेश मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अपचा वापर करा अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार पूर्वसूचना पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta