vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उन्हाचा चटका? आज कसं असेल हवामान

महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उन्हाचा चटका? आज कसं असेल हवामान

मुंबई प्रतिनिधी-

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी परतीच्या प्रवासाने झोडपले आहे. मुंबईतही मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळं कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

म्यानमारच्या किनाऱ्यालगत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत आहे. बांगलादेशच्या किनाऱ्याकडे सरकताना ही प्रणाली विरून जाणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणासह गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागातून माघार घेतली आहे. तर, महाराष्ट्रातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.

आज कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामान असणार आहे. तसंच, वातावरणात उन्हाचा चटकादेखील कायम राहणार आहे.

ऑक्टोबर हिटला सुरुवात,मुंबईत काही दिवस ढगाच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. तर ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून उकाडा जाणवू लागणार आहे. असे असले तरी काही भागांत पहाटे काही ठिकाणी धुके आणि दव पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळं ही थंडीचा चाहूल आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट,यंदा देशासह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. देशात एकूण 12 टक्के तर महाराष्ट्रात 19 टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक 39 टक्के आणि विदर्भात 26टक्के पावसाची घट झाली आहे, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

साप दिसला की मारू नका!’ भरणे येथील नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना सर्पसंवर्धनाचा संदेश..

माविमची साथ आणि परिश्रमाच्या जोडीतून अगरबत्ती उद्योगाचा दरवळ

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश धायगुडे व प्रियंका बर्डे-मोरे यांचा भाजपमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

vishwatmaklokswamivarta

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना, अभिप्राय देण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन*तक्रारी स्विकारण्यासाठी आठ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष*

vishwatmaklokswamivarta

ग्रामसभांच्या सक्षमीकरणातून प्रत्येक गावाचा शाश्वत विकास साधा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**‘विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ व पेसा कायद्यावर एक दिवसीय कार्यशाळा व पंच संमेलन**शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta