vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विविध विकासकामांचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून विकासकामे

विविध विकासकामांचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेतून विकासकामे..

सोलापूर, प्रतिनिधी) : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक २१ मधील सहारा नगर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आले

माजी नगरसेविका तसलीम इरफान शेख यांच्या प्रयत्नातून सहारा नगर परिसरातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास होऊन नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ नेते हाजी एम. डी. शेख, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, इरफान शेख, दशरथ कसबे अशपाक शेख, माजी नगरसेविका सौ. तसलीम इरफान शेख, सौ. पाटील ताई यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे,कणगर येथे अचानक भेट देऊन कामाची केली पाहणी; सरपंचांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले

ऋणानुबंध वधू-वर सूचक मंडळाच्या बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

vishwatmaklokswamivarta

जादूटोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

vishwatmaklokswamivarta

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ :एकापेक्षा अधिक गुणवत्ता यादीत नाव आले तरी नियुक्ती एका संवर्गातच..

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧