vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

स्वा.सै.स्व. रामभाऊजी राऊत संस्थेचा साडी वाटपाचा स्तुस्त्य उपक्रम-महापौर वंदना मगरे-भविष्यातही हा सिलसिला कायम ठेवा-संगीताताई गोरंट्याल उत्तम शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा-उपमहापौर राजेश राऊत

स्वा.सै.स्व. रामभाऊजी राऊत संस्थेचा साडी वाटपाचा स्तुस्त्य उपक्रम-महापौर वंदना मगरे-भविष्यातही हा सिलसिला कायम ठेवा-संगीताताई गोरंट्याल उत्तम शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा-उपमहापौर राजेश राऊत

जालना/प्रतिनिधी

स्वा.सै.स्व. रामभाऊजी राऊत या संस्थेचा महिलांना साडी वाटपाचा उपक्रम स्तुस्त्य असल्याचे प्रतिपादन जालना महापालिकेच्या महापौर वंदना मगरे यांनी येथे बोलतांना केले तर भविष्यातही हा सिलसिला कायम ठेवा असे माजी नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल यांनी केले.

स्वा.सै.स्व. रामभाऊजी राऊत यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त उपमहापौर राजेश राऊत आणि राऊत परिवाराने आयोजित केलेल्या साडी वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी स्वा.सै.स्व. रामभाऊजी राऊत यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, महिला व बालकल्याण सभापती सौ. संध्याताई देठे, बांधकाम सभापती सौ. मायाताई जोशी, शिक्षण सभापती सौ. भाग्यश्रीताई जोगस, पाणीपुरवठा सभापती सौ. पूनमताई स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर वंदना मगरे म्हणाल्या की, आपल्या राजेश राऊत यांचे नेहमीच सहकार्य राहिंले. ते या पुढेही राहील, यात कसलीही शंका नाही. स्वा.सै.स्व. रामभाऊजी राऊत यांच्या कार्याचाही त्यांनी आपल्या भाषणातून उल्लेख केला. तर सौ. संगीताताई गोरंट्याल पुढे बोलतांना म्हणाल्या की, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळातही स्वा.सै.स्व. रामभाऊजी राऊत यांच्या कामाचा गौरव होत होता. राजेश राऊत यांचे कार्य खरोखरच कौतूकास पात्र आहे, नाही तर आज-काल कोण असे काम करतं, असे सांगून त्यांनी श्री राजेश राऊत यांच्या कार्याचा गौरवपुर्ण उल्लेख केला.

त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात उपमहापौर राजेश राऊत म्हणाले की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मित्र मंडळ व जालना शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या वर्षी स्पर्धेसाठी ‘माझ्या स्वप्नातील उज्ज्वल शहर’ ही संकल्पना ठेवण्यात आली होती. यामध्ये पाणी आडवा, पाणी वाचवा; झाडे लावा, झाडे जगवा; स्वच्छता राखा आणि प्लास्टिकमुक्त जालना शहर अशा पर्यावरणपूरक विषयांवर आधारित सजावटींचा समावेश होता. या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रथम पारितोषिक – डॉ. कल्याणी जोशी, द्वितीय पारितोषिक – कु. साक्षी बाभळे, तृतीय पारितोषिक – राधिका हिरासकर या विजेत्यांना महापौर सौ. वंदनाताई मगरे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, महिला व बालकल्याण सभापती सौ. संध्याताई देठे, बांधकाम सभापती सौ. मायाताई जोशी, शिक्षण सभापती सौ. भाग्यश्रीताई जोगस, पाणीपुरवठा सभापती सौ. पूनमताई स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून नागरिकांनी पर्यावरणपूरक सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला. पाणी वाचवा . स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त जालना शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही राजेश राऊत म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय देठे यांनी तर उपस्थितांचे आभार रवि राऊत यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, शिवसेना शहर प्रमुख विष्णु पाचफुले, अ‍ॅड.दिपक कोल्हे. अंकुशराव राऊत, वामनराव राऊत, रवि राऊत विजय कामड, प्रा. राजेंद्र भोसले, सतिष जाधव, सचिन राऊत, गणेश भोसले, आकारा देशमाने, प्रकाश जगताप, विजय राऊत, सागर देवकर, निलेश राऊत, विनोद पटेल, ओम राऊत, नरेश जैस्वाल, नवीन पटेल, मनोज गुळवे, साईनाथ मोरे, सुरेश गाजरे, सतीष संचेती, ओमप्रकाश भारुका आदींची उपस्थिती होती.

………………..चौकट………………..

मन की बात!

याच कार्यक्रामादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या कार्यक्रमाची एक झलक उपस्थितांना दाखवण्यात आली. याचीच चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

———————————————————————————————————

छाया – जावेद तांबोळी

 

2 attachment

• Scanned by Gmail

संबंधित पोस्ट

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

कल्याण पूर्व येथील तेजस फिटनेस क्लब चा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला

vishwatmaklokswamivarta

म्हाडाशी संबंधित विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांचा उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला आढावा रहिवाशांचे म्हणणे ऐकून सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी सायकलवरून आले कार्यालयातदिला पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश