vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मानवी तस्करीच्या गुन्ह्यांचा तपास केवळ आरोपीला अटक करण्यापुरता मर्यादित न ठेवता, गुन्ह्यामागील संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी ‘बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस’ शोधून नेटवर्क-केंद्रित तपास करावा-पोलीस महासंचालक सदानंद दाते

मानवी तस्करीच्या गुन्ह्यांचा तपास केवळ आरोपीला अटक करण्यापुरता मर्यादित न ठेवता, गुन्ह्यामागील संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी ‘बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस’ शोधून नेटवर्क-केंद्रित तपास करावा-पोलीस महासंचालक सदानंद दाते

मुंबई प्रतिनिधी -मानवी तस्करीच्या गुन्ह्यांचा तपास केवळ आरोपीला अटक करण्यापुरता मर्यादित न ठेवता, गुन्ह्यामागील संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी ‘बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस’ शोधून नेटवर्क-केंद्रित तपास करावा, असे निर्देश #पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी राज्यस्तरीय कार्यशाळेत दिले.

#महाराष्ट्रपोलीस दल आणि प्रकृती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पोलीस महासंचालक कार्यालयाच्या दरबार सभागृहात #न्यायसेतू२०२६ राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस माजी महासंचालक डॉ. पी. एम. नायर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (महिला व बालकांवरील अपराध प्रतिबंध) अस्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत उपस्थित होते मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि गुणवत्तापूर्ण तपास आवश्यक असल्याचे महासंचालक दाते यांनी सांगितले.

तपासादरम्यान पीडितांना आधार देणे, त्यांची ओळख सुरक्षित ठेवणे आणि वैद्यकीय मदत, दुभाषा व मानसिक समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यावर महासंचालक दाते यांनी भर दिला. मानवी तस्करीविरोधी विशेष पथकांचे प्रशिक्षण अधिक सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

#तस्करी

संबंधित पोस्ट

अ.भा. लोकहित महासंघाची स्थापना

एमएसपी’अंतर्गत खरेदी केलेल्या धान व भरडधान्याची प्रलंबित देयके तातडीने अदा करा – मंत्री छगन भुजबळ

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

पीएम-सेतू योजनेमुळे आयटीआयचे रूप पालटणार सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ७२३ कोटींची गुंतवणूकः ३६ नवीन व्यवसाय सुरू होणार, १२० व्यवसायांचे आधुनिकीकरण होणार

vishwatmaklokswamivarta

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी किशन जावळे*​दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा*