vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदलणार – मंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपजन सोहळा

 कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदलणार – मंत्री गिरीश महाजन-त्र्यंबकेश्वर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपजन सोहळा

नाशिक, प्रतिनिधी: त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात या शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे आज दुपारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके आहेर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी रविकांत सानप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारण्यात येत आहे. ही इमारत सर्वसुविधायुक्त असेल. नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुकास्तरावरील एवढी मोठी राज्यातील तालुकास्तरावरील पहिली इमारत ठरेल.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षभरात त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरा मोहरा बदलेला दिसेल. त्यामुळे या शहराचा जगभर नावलौकिक होईल.त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, असेही नियोजन करण्यात आले आहे. प्रारंभी तहसीलदार श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची माहिती दिली.

अशी असेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारतत्र्यंबकेश्वर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे क्षेत्र 2001 चौरस मीटर आहे. तळ मजला अधिक चार मजली इमारत असेल. बैठक कक्ष असेल. एकूण 10 हजार 401 चौरस मीटर बांधकाम करण्यात येईल. तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था असेल. या इमारतीत पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1, पंचायत समिती, दुसऱ्या मजल्यावर उपकोषगार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2, उपविभागीय अधिकारी यांचे शिबिर कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, चौथ्या मजल्यावर कृषी, पंचायत समिती, बैठक कक्ष, भांडार कार्यालय असेल, तर पाचव्या मजल्यावर बैठक कक्ष असेल. या इमारतीसाठी एकूण 61 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने 46 कोटी 57 लाख रुपयांच्या रकमेस, तर ग्राम विकास विभागाने 14 कोटी 50 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता  आहे.

000l0

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर असे करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गतीसह गुणवत्तने विकासकामे पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य• मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण-    महानगरपालिकेद्वारे विहित मुदतीच्या आत पुलाचे काम पूर्ण

स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

लोकायुक्त न्या. कानडे यांच्याकडून ५३ वा अहवाल राज्यपालांना सादर