vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 7036 झाडांची छाटणी – पावसाळी कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 7036 झाडांची छाटणी – पावसाळी कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष छाटणीचे काम दररोज युद्धपातळीवर सुरू आहे. धोकादायक वृक्षांची पाहणी करण्यात आलेली असून झाडे काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उद्यान विभागामार्फत 8 विभाग कार्यालयात 9 वृक्ष छाटणीची वाहने असून त्यांच्यामार्फत दररोज मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणीची कामे सुरू आहेत. यामध्ये बेलापूर- 1400, नेरूळ- 578, तुर्भे- 1159, वाशी- 113, कोपरखैरणे- 672, घणसोली- 1014, ऐरोली- 1622 व दिघा- 478 अशा 8 विभाग क्षेत्रात एकूण 7036 झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे.

          याबाबत उदयान सहाय्यक यांनी वेळोवेळी कार्यक्षेत्रात पाहणी करुन केलेल्या सर्व्हेनुसार तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्राप्त नगरसेवकांचे अर्ज, नागरिकांचे कॉल्स, व्हॉट्स अॅप मेसेज, ग्रिव्हिअन्स ॲप अशा विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या तक्रारींनुसार ठिकठिकाणी अनेक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आलेली आहे.

          याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुकलेली, मृत आणि प्रथमदर्शनी धोकादायक अशी एकूण 104 झाडे आढळून आली असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे.

            सद्यस्थितीत वादळी वा-यासह होणा-या मुसळधार पावसामुळे सुस्थितीत असलेली झाडेदेखील उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. नवी मुंबईतील नागरिकांकडून याबाबत दैनंदिन तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार उन्मळून पडलेली झाडे / सोसाटयाच्या वारा-पावसामुळे पडलेल्या फांदया तत्परतेने उचलण्याबाबत अग्निशामक विभाग, घनकचरा विभाग यांच्याशी समन्वय साधुन ते तात्काळ हटवण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वादळी वा-यासह असलेल्या पावसात झाडे पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घ्यावी.

याकरिता – झाडाखाली वाहन उभे करु नये,        पाऊस सुरु असताना झाडाखाली उभे राहू नये.    कमकुवत, झुकलेल्या झाडांपासून सुरक्षित अंतर राखावे.   सोसायटीतील धोकादायक झाडांची वेळेवर छाटणी करुन घ्यावी.       रस्त्यावर झाड पडल्यास अथवा धोकादायक आढळल्यास संबंधित विभाग कार्यालयाला किंवा महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन विभागाला 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित कळवावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

ऐरोली आदिवासी पाडा येथे उपयोगी साहित्याचे वितरण

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात सौरऊर्जेचा प्रभावी उपयोग — जिल्हाधिकारी किशन जावळे

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

जलपुनर्भरणासंदर्भात व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्‌घाटन

नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा, आरपीआय नेते बाळासाहेब मिरजे यांची कारवाईची मागणी..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी येथे ७,२००कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनकेले