vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन

राज्य प्रतिनिधी -आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच समाजाच्या घटनात्मक आणि न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा रविवार, 21 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता जालन्यातील मुख्य मार्गावर काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी गुरुवार दि. 2 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.

संयोजकांच्या माहितीनुसार, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने नसून संपूर्ण समाजाच्या एकजुटीतून आयोजित करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मूळ रचनेत बदल करण्याचा तसेच उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यास लोकशाही आणि सनदशीर मार्गाने विरोध करण्याचा या मोर्च्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मोर्चात जालना जिल्ह्यासह परिसरातील अनुसुचित जातीमधील सर्व समाजबांधव, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.

मोर्चाचे आयोजन जालना शहरातील मुख्य मार्गावर करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शासनाला आरक्षण उप वर्गीकरणाला विरोध कळविण्यात येणार आहे. समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीचे दर्शन घडविण्याचा निर्धार संयोजकांनी व्यक्त केला आहे.

यावेळी अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, सुदामराव सदाशिवे, प्राचार्य दादासाहेब गजहंस, प्रा. शांताराम रायपुरे, संदीप खरात, अ‍ॅड. रिमा खरात, महेंद्र रत्नपारखे, हरिष रत्नपारखे, सुनिल रत्नपारखे, सुशिल सुर्यवंशी, अ‍ॅड. सिध्दार्थ चव्हाण, राहुल रत्नपारखे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

00000

संबंधित पोस्ट

खापाल कामकाजासाठी वनविभागातून सेवानिवृत्त झालेल्याइच्छुक सेवानिवृत्त लेखापालांनी अर्ज करावेत….

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांच्याकडून अभिवादन

विधानपरिषद इतर कामकाज – अल्पकालीन चर्चा भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणार- मंत्री डॉ. उदय सामंत

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता  सीमांकनासह विशिष्ट क्रमांक दिला जाणार..

vishwatmaklokswamivarta

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

vishwatmaklokswamivarta