vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जुन्नर तालुक्यात संपन्न दीड हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जुन्नर तालुक्यात संपन्न दीड हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे प्रतिनिधी

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर श्री विघ्नहर सास्कृतिक भवन ओझर येथे आयोजित करण्यात आले. या शिबाराचे उद्घाटन आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण २२ स्टॉलच्या माध्यमातून १ हजार ६४१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

 

यावेळी जुन्नर-आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार रणजीत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, तालुक्यातील शासकीय विभागातील कार्यालय प्रमुख व पंचायत समिती सभापती / उपसभापती व जिल्हा व पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालयातील संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, सेतू कार्यालय व महसूल विभाग उपस्थित होता. तसेच तालुक्यातील सर्व गावांचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय महावितरण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव, नगर परिषद विभाग, सहाय्यक निबंध कार्यालय जुन्नर, भूमी अभिलेख कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस जुन्नर, पोलीस विभाग, एस टी महामंडळ व इतर उपस्थित होते.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. यामध्ये वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग योजना, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार लिंक आदी विविध सेवांचा समावेश होता. नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली, नागरिकांनी शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला.#छत्रपतीशिवाजीमहाराजमहसूलसमाधानशिबिर #महसूलविभाग #जुन्नर #ओझर #शासकीययोजना #जनसेवा #पुणेजिल्हा

संबंधित पोस्ट

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन

पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याबाबत प्रशासनाचे मंथन

कोकणातील पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज,नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, यंत्रणा अहोरात्र कार्यरत

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन