vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

 

बुलढाणा, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नूतनीकरण (Renewals) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील संबंधित विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असलेल्या, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आणि अन्य आवश्यक सुविधांसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.

जिल्हा व तालुका स्तरावर शिक्षण घेणाऱ्या नूतनीकरण (Renewals) विद्यार्थ्यांनी योजनेच्या निकषांनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे. मागील शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनीच नूतनीकरणासाठी अर्ज करावा.

स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी संबंधित कार्यालयांच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण अर्ज तालुका किंवा जिल्हास्तरावरील संबंधित वसतिगृहात जमा करावा. ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा. मुदत संपण्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जपमाळ याविषयी काही महत्वपूर्ण माहिती

महाड येथील दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ संपन्न,राज्य शासनाचे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देशकामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश..

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन झालेल्याबीडीडी चाळीच्या सदनिकांचे #चावी वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजनासाठीसंबंधित विभागांनी समन्वयाने आखणी करावी- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या

vishwatmaklokswamivarta