vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ठाण्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) राबविण्याबाबत आवाहन;       युवकांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

ठाण्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) राबविण्याबाबत आवाहन;       युवकांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही राज्य शासनाची एक अत्यंत महत्त्वाची व महत्त्वाकांक्षी योजना आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेत सहभागी होऊन स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करावा आणि उद्योजक बनावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे उप आयुक्त (उद्योग व सेवा) सो. मे. देवरे यांनी केले आहे.

योजनेचे स्वरूप व निकष,कार्यक्षेत्र: संपूर्ण ठाणे जिल्हा (अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक). वयोमर्यादा: किमान १८ वर्षे पूर्ण. शैक्षणिक पात्रता: ५ लाखांपढील सेवा उद्योगांसाठी आणि १० लाखांपढील उत्पादन उद्योगांसाठी किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. कमाल प्रकल्प मर्यादा: उत्पादन उद्योगांसाठी १०० लाख रुपये आणि सेवा/कृषी पूरक उद्योगांसाठी ५० लाख रुपये. स्वगुंतवणूक: ५ ते १० टक्के. अनुदान मर्यादा: १५ ते ३५ टक्के. पात्र घटक: वैयक्तिक, भागीदारी संस्था आणि बचत गट (फक्त नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगांसाठी).

प्रकल्प अहवाल निकष,स्थिर भांडवल: सेवा व कृषी पूरक उद्योगांसाठी प्रकल्पाच्या ४०% आणि उत्पादन उद्योगांसाठी ६०% मर्यादित. इमारत बांधकाम: जास्तीत जास्त २०%. खेळते भांडवल: सेवा व कृषी पूरक उद्योगांसाठी ६०% आणि उत्पादन उद्योगांसाठी ४०% मर्यादित.

ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

१. पासपोर्ट साइज फोटो, २. आधार कार्ड, ३. जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसाईल प्रमाणपत्र, ४. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (उदा. ८ वी, १० वी, १२ वी किंवा पदवीचे गुणपत्रक), ५. हमीपत्र (Undertaking Form), ६. प्रकल्प अहवाल, ७. जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा अल्पसंख्याक असल्यास), ८. विशेष प्रवर्ग प्रमाणपत्र (माजी सैनिक किंवा अपंग असल्यास), ९. REDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असल्यास त्याचे प्रमाणपत्र, १०. लोकसंख्येचा दाखला (२०,००० पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास)

महत्त्वाच्या सूचना व आवाहन,इच्छुक लाभार्थ्यांनी http://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. ही योजना पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाइन असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच शासनाने कोणत्याही मध्यस्थाची किंवा एजंटची नेमणूक केलेली नाही. लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सविस्तर माहिती व मोफत अर्ज भरण्याची सुविधा जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्ज मंजूर करून देण्याच्या किंवा अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी मध्यस्थ पैशांची मागणी करत असल्यास असल्या भुलथापांना बळी पडू नये. अशा प्रकारचा फसवणुकीचा प्रयत्न झाल्यास नागरिकांनी तात्काळ जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथे लेखी किंवा प्रत्यक्ष तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बेरोजगारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन: शेतकऱ्यांनी तयारीला लागावे

vishwatmaklokswamivarta

ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

मिरजेत दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा 

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती-दि.१ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta