vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बेरोजगारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

*बेरोजगारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

सातारा प्रतिनिधी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. आस्थापनांमध्ये रुजू होणाऱ्या १२ वी पास प्रशिक्षणार्थीना ६ हजार, आयटीआय व पदविका प्रशिक्षणार्थीना ८ हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन ११ महिन्यापर्यंत मिळणार आहे. तरी या योजनेचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये विविध प्रकारच्या कार्य प्रशिक्षणाची संधी या विभागाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अधिवासी असणारे, उमेदवारांची वयोमर्यादा किमान वय १८ व कमाल ३५ तसेच किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास आयटीआय,पदविका, पदवी, पदव्युत्तर (शिक्षण चालू असलेले उमेदवार, NAPS, MAPS उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत), आपले आधार नोंदणी असणारे बँक खाते व आधार संलग्न मोबाईल क्रमांक उमेदवारांनी या विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन आपली प्रोफाईल अद्यावत करुन या विभागाच्या वेब पोर्टलवर सातारा जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना पतसंस्था,बँका शैक्षणिक संस्था इ. यांनी कार्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन रिक्त पदांची मागणी केली आहे अशा रिक्तपदांना अप्लाय करुन या योजनेचा लाभा घ्यावा व जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी तसेच २० पेक्षा जास्त मंजूर पदे असलेल्या शासकीय आस्थापनांनी आपल्याकडील प्रशिक्षणार्थीसाठीची रिक्तपदे शासन निर्णयानुसार पोर्टलवर अधिसूचित करण्यासाठी या कार्यालयाशी संपर्क करावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

000

संबंधित पोस्ट

खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वीजिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग

केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा,योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम.

चला, विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

भूजल माहिती भंडार व जलधर नकाशाकरण अभ्यास प्रकल्पांचे उपयोग    विषयावरील कार्यशाळा संपन्न

रस्तासुरक्षाअभियान २०२६चा #नांदेड मध्ये शुभारंभ#अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले