vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भुखंडाचे भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग मध्ये 1 रूपांतरासाठी 24 डिसेंबर रोजी शिबीराचे आयोजन*

*भुखंडाचे भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग मध्ये 1 रूपांतरासाठी 24 डिसेंबर रोजी शिबीराचे आयोजन*

 

सातारा प्रतिनिधी: सातारा शहरातील सदरबझार येथील आर्मी ऑफीसर सोसायटी. जे.सी.ओ. सोसायटी, व जवान्स सोसायटी मधील भुखंडाचे भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग मध्ये १ रूपातंर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 डिसेंबर रोजी 11 वाजता सातारा येथील आर्मी ऑफीसर सोसायटी येथील मिल्ट्री कॅन्टीन शेजारील सोसायटीचे सभागृहामध्ये शिबीर आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबीराचा भूखंड धारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी अशोक माने यांनी केले आहे.

भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करत असताना पुढील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. विहीत नमुन्यात अर्ज. ३ महातील मिळकतपत्रिका, प्रश्नाधिन क्षेत्राचा मोजणी नकाशाची मुळ प्रत सामील नाही, चालू वर्षाची सन २०२५/२०२६ बिनशेत सारा भरलेची पावती तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडील सदर मिळकतीचा ना देय प्रमाणपत्र सादर करावे. सोसायटीचे कोणतेही येणे बाकी नसलेबाबत दाखला व भोगवटा बदलाबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र सोबत सादर करावे तसेच नगरपालिकेचे ना देय प्रमाणपत्र सादर करावे. मिळकतपत्रिकेवरील सर्व फेरफार नंबरचे नक्कल प्रत. अर्जदारांनी प्रामुख्याने पुढील नमूद बाबींचा समावेश प्रतिज्ञापत्रात करणे आवश्यक आहे. प्रश्नाधील जागेबाबत कोणत्याही दिवाणी, फौजदारी, महसूली न्यायालयात दावा चालू अगर प्रलंबित नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,ब. खरेदीदार व कुटुंबाचे नावे इतर शासकीय भूखंड असल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र.क. प्रश्नाधिन जागेचे मूल्यांकनात भविष्यात तफावत आढळलेस त्यांची फरकाची रक्कम भरणेस तयार असल्याबाबत यांचे स्टॅपवर प्रतिज्ञापत्र घेणेत यावेत. प्रश्नाधीन जागेचे चालू वर्षाचे रेडीरेकनप्रमाणे होणारे किमतीबाबत दुय्यम निबंधक यांचा चालू स्थितीतील मुल्यांकन दाखला प्रकरणी सामील करावा. (मूळ प्रत) प्रश्नाधिन मिळकत मिळालेबावतचा आदेशाची मुळ नक्कल प्रत प्रकरणी सादर करावी. गावकामगार तलाठी यांचेकडील चालू वर्षाची बिनशेतीसारा पावती सादर करावी. भूखंड प्रदानासंबंधीचा आदेश.

0000

संबंधित पोस्ट

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप

vishwatmaklokswamivarta

नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

आरोग्य यंत्रणांचा आढावा दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला