vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र वैरण विकास धोरणामुळे पशुधनाला अधिक सक्षमपणे चारा उपलब्ध होईल – मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र वैरण विकास धोरणामुळे पशुधनाला अधिक सक्षमपणे चारा उपलब्ध होईल – मंत्री पंकजा मुंडे⁰

मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता अधिक सक्षमपणे उपलब्ध होईल असा विश्वास राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या हेतूने नियोजनात्मक विकासाचे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. बैठकीत ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ जाहीर करण्यात आले आहे. यात राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिके, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्त्रोत यांचा विचार आणि विविध शासकीय वैरण विकास योजनांचे नियोजन यात करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या शेतीपूरक व्यवसायांना भक्कम बळ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

दुष्काळ आढावा बैठकीस उपस्थिती

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविण्याबाबत उप समितीच्या आढावा बैठकीस मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. अपुऱ्या पावसामुळे राज्यातील विविध भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, पीक नुकसान, चारा उपलब्धता तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व शेतकरी बांधवांना आवश्यक मदत याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच उपाययोजनांबाबत चर्चा झाली.

 

0000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगरचा कृषी उत्पादकतेत देशपातळीवर गौरव; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना;लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे• 1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर• 82 हजार 627 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण

महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य– विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

vishwatmaklokswamivarta

मुंबईचा सुपुत्र आणि आशियाई सुवर्णविजेता हॉकी गोलरक्षक सूरज करकेराचा उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते सत्कार

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खासदार नरेश म्हस्के आक्रमक; अतिरिक्त आरक्षण खिडक्या, ‘धर्मवीर एक्सप्रेस’, सावंतवाडी टर्मिनस आणि नवीन रेल्वे थांब्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या..

vishwatmaklokswamivarta