vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून आज पासून पाहणी११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक परिस्थितीचा घेणार आढावा

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून आज पासून पाहणी११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक परिस्थितीचा घेणार आढावा

मुंबई, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक उद्यापासून, ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे

या दौऱ्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई तसेच संबंधित बाबींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. केंद्रीय पथकातील अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

तीन पथकांद्वारे विविध भागांची पाहणीदुष्काळ पाहणीसाठी ११ सदस्यांचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक नियुक्त करण्यात आले असून, त्यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा , अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि इतर संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाचे नेतृत्व मुक्तानंद अग्रवाल, संयुक्त सचिव (पीक विमा), कृषी व शेतकरी कल्याण विभाग करीत आहेत.

पाहणीसाठी पथकाचे तीन गट करण्यात आले आहेत. पथक एक पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर पुणे जिल्ह्यात तर पथक दोन मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांना भेट देणार आहे. पथक तीन विदर्भातील नागपूर, यवतमाळ जिल्हा आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.

केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय साधत होणाऱ्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय स्तरावरील वास्तव अधिक स्पष्टपणे समोर येण्यास मदत होणार आहे. जिल्हानिहाय अंतिम कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर पथकाच्या भेटींचे नियोजन करण्यात येणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

स्वच्छ जालना, सुंदर जालना! 🧹✨

ठाणे महानगरपालिकेचा 44 वा वर्धापन दिन 1 ऑक्टोबर रोजी· राम गणेश गडकरी रंगायतन येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘ठाणे भूषण’, ‘ठाणे गौरव’ व ‘ठाणे गुणीजन’ व ‘विशेष’ पुरस्काराने होणार गौरव

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नियमांचे काटेकोर पालन व्हावे– राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,पातूर येथे मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी

आषाढी वारीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाचे पंढरपूर नगरी स्वच्छता कार्य

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांनी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घ्यावा – देविदास कोकाटे दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न