vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ; खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व दिव्यांग खेळाडूंना संधी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ; खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व दिव्यांग खेळाडूंना संधी

 

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक पात्र खेळाडू व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू व व्यक्तींसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात

शासन निर्णय दिनांक २९ डिसेंबर २०२३ व २५ जानेवारी २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची सुधारित नियमावली २०२३ निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी १६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे.

इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. संकेतस्थळावरील ‘ताज्या घडामोडी’ या विभागात ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ या शीर्षकावर क्लिक केल्यानंतर अर्ज भरण्याबाबत सविस्तर सूचना उपलब्ध आहेत.

00000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय खेळाडू भक्ती आंब्रे यांनी स्वीकारला जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

सेवा_संकल्प_अभियानश्री क्षेत्र यवतेश्वर परिसरात स्वच्छता मोहीम संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिद्दीच्या जोरावर रंगला अंध मुलांचा क्रिकेट सामना रोमहर्षक स्पर्धेत टीम शिवनेरी संघाचा विजय- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्नमधील आणखी एक उपक्रम