vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नगरसेविका सुलोचना गोर्डे यांचे दुष्काळग्रस्तांसाठी वेतनदान!- एक वर्षाच्या मानधनातील १ लाख १ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द

नगरसेविका सुलोचना गोर्डे यांचे दुष्काळग्रस्तांसाठी वेतनदान!- एक वर्षाच्या मानधनातील १ लाख १ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द

जालना, प्रतिनिधी दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देत जालना महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका सुलोचना लक्ष्मण गोर्डे यांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडविले आहे. त्यांनी आपल्या नगरसेविका पदाच्या एक वर्षाच्या मानधनातून मिळणारी एकूण १ लाख १ हजार रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सुलोचना गोर्डे यांचे पुत्र निलेश गोर्डे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी

प्रत्येकाने आपापल्या परीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनालासकारात्मक प्रतिसाद देत सुलोचना गोर्डे यांनी आपल्या मानधनाची संपूर्णरक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारे मानधन स्वतःच्या उपयोगासाठी न ठेवता तेसंकटग्रस्तांच्या मदतीसाठी अर्पण करण्याचा त्यांचा निर्णय सामाजिकजाणिवेचा आणि संवेदनशीलतेचा परिचय करून देणारा आहे. दुष्काळाच्या झळासोसणार्‍या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी त्यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे. लोकप्रतिनिधींचे पद हे केवळ अधिकार उपभोगण्यासाठी नसून जनतेची सेवा करण्यासाठी असते, याचा आदर्श सुलोचनागोर्डे यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे. त्यांच्या या वेतनदानउपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, इतर लोकप्रतिनिधींनीही सामाजिकबांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, अशी अपेक्षाव्यक्त होत आहे.

०००००००००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र बाल संसद २०२६’मध्ये ३४ जिल्ह्यांतील शंभरहून अधिक बालप्रतिनिधींचा सहभाग२० नोव्हेंबरला पुण्यात प्रथमच राज्यस्तरीय उपक्रम

vishwatmaklokswamivarta

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार – डॉ हर्षदीप कांबळे चवदार तळे सत्याग्रह दिन बार्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे केला साजरा

राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात’लेखापरीक्षक नेमणूकीसाठी निविदा सादर करण्‍याची मुदत 16 मे पर्यंत

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध