vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन शेकडो शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली;

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन शेकडो शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली;

जालना,(प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जालना शिवसेना (उध्दवबाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख रुपमताई रमेश घुगेयांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा संघटक भानुदास घुगे, शहरप्रमुख दिपक रणनवरे, महिलाआघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपमताई घुगे, संदीप झारकंडे, बाबुराव कायंदे,बाबासाहेब पाखरे, तुळशीराम काळे, बबनराव मिसाळ, शेख रईस, विनोद भालेकर,कांतीलाल बोरडे, शेख जावेद, नामदेव तिडके, गोपीनाथ आटोळे, जनार्धन गिरामयांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्याप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनकार्याला आणि आक्रमकनेतृत्वाला उजाळा देत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष आणिअन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची त्यांची भूमिका यावेळी अधोरेखित करण्यात आली.

दरम्यान, राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवरून यावेळी सरकारवर टीका करण्यात आली. पावसाअभावी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून,अद्यापही त्याला अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज असते, तर दुष्काळाच्या संकटात सापडलेल्याशेतकर्‍यांना त्यांनी कधीही वार्‍यावर सोडले नसते, अशी भावना महिलाआघाडीच्या जिल्हाप्रमुख रूपमताई घुगे यांनी व्यक्त केली. तरशिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत सर्वसामान्य नागरिक,शेतकरी आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्षकरण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

००००००फोटो ओळी……८- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्तशिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख रुपमताई रमेश घुगे यांच्या संपर्ककार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनेशिवसैनिकांची उपस्थिती होती.

 

संबंधित पोस्ट

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

अमृत’तर्फे विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन विविध संस्थांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, चारा छावण्या व रोजगार हमीची कामे सुरू करा : खासदार डॉ. कल्याण काळे,पीक परिस्थिती आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले; पीकविम्यासाठी पूर्वीची पोर्टल प्रणाली सुरू करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 1 लाख 16 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्‍तआमदार सुधाकर अडबाले यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश..

लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन उत्साहात-सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,राज्याच्या प्रगतीत सहकार चळवळीचा मोठा हातभार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले