
Will Smith कडून Oscars 2022 मध्ये Chris Rock ला लगावलेल्या कानशिलात प्रकाराबाबत माफीनामा जारी..
विशेष प्रतिनिधीविल स्मिथ ची पत्नी Jada Pinkett Smith च्या जाडपणावर केलेल्या विनोदावर भडकून 94th Academy Awards दरम्यान कॉमेडियन क्रिस रॉकच्या श्रीमुखात भडकवली होती.
अमेरिकेत लॉस एंजेलिस च्या Dolby Theatre रविवार (27 मार्च) च्या रात्री यंदा 94 वा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2022 ) सोहळा रंगला. या पुरस्कार सोहळ्याची सध्या चर्चा आहे ती अमेरिकन अभिनेता विल स्मिथने (Will Smith ) क्रिस रॉक (Chris Rock) च्या लगावलेल्या कानशिलात प्रकरणाबददल. विल स्मिथने या पुरस्कार सोहळ्यात त्याच्या पत्नीवरून केलेल्या विनोदावर भडकून भर कार्यक्रमामध्ये रॉकच्या कानाखाली लगावली होती. या प्रकाराची नंतर सर्वत्र चर्चा झाली. जगभरात लोकांनी यावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर विल स्थिमने आपलं वागणं चूकीचे असल्याचं मान्य करत रॉकची माफी मागितली आहे. त्याने इंस्टाग्राम पोस्ट लिहित याबाबत खुलासा केला आहे
विल स्मिथने लिहलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याने लिहले, ‘ प्रेम आणि दयाळूपणा यांनी भरलेल्या या जगात हिंसेला जागा नाही. माझं वागणं चूकीचे आणि नियमांना धरुन नव्हते. कोणत्याही प्रकारची हिंसा ही निषेधार्थ आहे. पत्नी Jada च्या वैद्यकीय कारणांमुळे आलेल्या स्थुलपणावरून झालेला विनोद मी सहन करू शकलो नाही आणि इमोशनल होऊन रिअॅक्ट झालो.’



