vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

ब्रिटन पोलीस अधिकाऱ्यानेच केले 24 बलात्कार; 71 लैंगिक गुन्ह्यांनंतर निलंबन…

ब्रिटन पोलीस अधिकाऱ्यानेच केले 24 बलात्कार; 71 लैंगिक गुन्ह्यांनंतर निलंबन…

 

विदेश प्रतिनिधी

ब्रिटन पोलीस अधिकाऱ्यानेच केले 24 बलात्कार; 71 लैंगिक गुन्ह्यांनंतर निलंबन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी डेव्हिड कॅरिकसारख्या लोकांना कधीही पोलिसांत समाविष्ट करू नये, असे म्हटले आहे. या घटनेने पोलिसांची प्रतिमा डागाळली असून लोकांचा विश्वास डळमळीत झाल्याचेही त्यांनी मान्य केले.

 

पोलिसांचे काम देशातील जनतेचे रक्षण करणे आणि त्यांना गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवणे हे आहे. मात्र पोलिसांच्या नावाला बट्टा लावणारे प्रकरण समोर आले आहे. लंडनमध्ये  एकूण 71 लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका पोलिसाला (लंडन पोलीस) नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत या पोलिसाने 24 महिलांवर बलात्कार (Rape) केला आहे. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी अशाच इतर शेकडो गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे, ज्यात पोलिसांचा सहभाग आहे.

लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांत कार्यरत एका अधिकाऱ्याने 24 बलात्कारांसह 49 लैंगिक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. स्काय न्यूज ब्रॉडकास्टरनुसार, 48 वर्षीय अधिकारी डेव्हिड कॅरिकने आपल्या 18 वर्षांच्या सेवेदरम्यान हे बलात्कार केले. एकूण 12 महिलांवरील बलात्काराचे हे 24 गुन्हे आहेत.लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांत कार्यरत एका अधिकाऱ्याने 24 बलात्कारांसह 49 लैंगिक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. स्काय न्यूज ब्रॉडकास्टरनुसार, 48 वर्षीय अधिकारी डेव्हिड कॅरिकने आपल्या 18 वर्षांच्या सेवेदरम्यान हे बलात्कार केले. एकूण 12 महिलांवरील बलात्काराचे हे 24 गुन्हे आहेत.

या घडलेल्या घटनांबद्दल महानगर पोलिसांनी माफी मागितली आहे. कॅरिकच्या गर्लफ्रेंडनेही त्याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत

डेव्हिड हा ऑनलाइन डेटिंग साइट्स किंवा सोशल इव्हेंटमध्ये महिलांना भेटायचा आणि पोलीस असल्याचा फायदा घेऊन त्यांचा विश्वास संपादित करायचा. डेव्हिडने अनेक महिने आणि वर्षांमध्ये महिलांवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. डेव्हिडला 16 जानेवारी रोजी साउथवॉर्क क्राउन कोर्टात हजर केले गेले. मेट्रोपॉलिटन पोलीस कमिशनर मार्क रॉली यांनी घडल्या प्रकाराबाबत सर्वांची माफी मागितली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी सांगितले की, आता जवळपास 1,000 लैंगिक गुन्हे आणि घरगुती शोषणाच्या दाव्यांचा तपास केला जात आहे, ज्यामध्ये सुमारे 800 अधिकारी सामील आहेत

 

संबंधित पोस्ट

पाकिस्तानमधील दारुल उलूम हक्कानिया येथे  आत्मघाती बॉम्बस्फोटात सहा ठार , तर एका वेगळ्या मशिदीत झालेल्या स्फोटात अनेक जखमी…

vishwatmaklokswamivarta

लिझ ट्रस यांनी युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा, अयशस्वी कर-कपात अर्थसंकल्पामुळे घेतला निर्णय..

vishwatmaklokswamivarta

बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक – अलियाक्सांड्र मात्सुकोऊ

अमेरिकेत पुन्हा एकदा बेछूट गोळीबाराची घटना घडली आहे. एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला 

vishwatmaklokswamivarta

चायना मध्ये म्यानमार  चे राजदूत यांचा चा मृत्यू; मागील वर्षभरात चौथ्या राजदूताचा अचानक मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने बँकॉक येथे सकारात्मक स्पंदनांच्या महत्त्वाविषयीचे संशोधन सादर !सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांतीचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय