vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा**‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*

*गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा**‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*

 

 नवी मुंबई, प्रतिनिधी:- गृहमंत्री अमित शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली. ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.

            कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवा, राधास्वामी ब्यास लंगर सेवा, बाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवा, संत सेवालाल महाराज लंगर सेवा, बाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवा, भगवान झुलेलालजी लंगर सेवा, भाई मतीदासजी लंगर सेवा या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला, तर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या समागम कार्यक्रमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल”च्या जयघोषात भाविकांनी दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत घेतला.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः लंगर सेवा देत या परंपरेचा सन्मान केला. ‘हिंद-दी-चादर’ समागमातून सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.

०००

संबंधित पोस्ट

आज उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा …

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा -पालकमंत्री नितेश राणे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ

आता लाडकी बहीण योजनेसाठी आधार प्रमाणीकरण…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सुविधांवर वारकरी समाधानी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, ठाणे-*अनधिकृत शाळांपासून सावधान; मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्या – शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे*