vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुतळा उभारण्याकडे दुर्लक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान!; खासदार राहुल शेवाळे यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

 पुतळा उभारण्याकडे दुर्लक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान!; खासदार राहुल शेवाळे यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

मध्य रेल्वेवरील सर्वात मोठय़ा अशा रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असून महाराजांसारख्या पराक्रमी योद्धयाचा पुतळा सँडहर्स्ट रोड येथील बंद कारशेडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ठेवण्यात आला आहे

[ मुंबई प्रतिनिधी: मुंबई : मध्य रेल्वेवरील सर्वात मोठय़ा अशा रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असून महाराजांसारख्या पराक्रमी योद्धयाचा पुतळा सँडहर्स्ट रोड येथील बंद कारशेडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ठेवण्यात आला आहे. तो उभारण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. हा शिवरायांचा अवमान आहे, अशी टीका करत हा पुतळा सीएसएमटी स्थानकात उभारण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

 

सीएसएमटी स्थानकाच्या अठरा क्रमांक फलाटाबाहेरील रेल्वेच्या मोकळय़ा परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्याअंतर्गत या परिसरात दहा ते बारा फूट उंच चौथरा आणि त्यावर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज असा एकूण २० ते २५ फूट उंचीचा पुतळा या परिसरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् अंतर्गत तीन वर्षांपूर्वी फायबरचा पुतळा सँडहस्र्ट रोडमधील वाडीबंदर येथील रेल्वेच्या बंद शेडमध्ये तयार करण्यात आला, मात्र धातूचे काम अंतिम टप्प्यात असतानाच हे काम रेल्वेकडून थांबविण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून शिवरायांचा पुतळा बंद शेडमध्येच आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये ११ ऑगस्टला प्रकाशित झाले.

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

मुंबई पोलिसांनी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुचाकी स्पर्धेचे बेकायदेशीर आयोजन, 82 जणांना अटक..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे-डॉ. समीर तोडणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात..