
आजपासून कास महोत्सवाला सुरुवात, खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते उद्धाटन…
खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्धाटन झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पठारावर आजपासून कास महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या भागातल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन आणि वन विभागानं यंदा प्रथमच हा महोत्सव आयोजित केला आहे. खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्धाटन झाले आहे. येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत महोत्सव सुरु राहणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज या महोत्सवाचं उद्धाटन झालं. येत्या ९ ऑक्टोबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहणार असून यामध्ये कास परिसरातल्या गावांची वैशिष्टयं तसंच जैव विविधतेची माहिती दिली जाईल.



