vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

विजय हजारे ट्रॉफी : 2022 फायनल लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र सामना..

विजय हजारे ट्रॉफी : 2022 फायनल लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र आमनेसामने, कुठे पाहणार सामना?

 

क्रिकेट प्रतिनिधी

महाराष्ट्राचा संघ दोन दशकांची प्रतीक्षा संपवू शकतो कारण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्कृष्ट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाड. फायनलपूर्वी गेल्या 9 पैकी 7 सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 1000 च्या वर धावा झाल्या आहेत.

 

विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या अंतिम सामन्यात सौराष्ट्र आणि महाराष्ट्र संघ आमनेसामने (Saurashtra vs Maharashtra) आहेत. महाराष्ट्राने गेल्या 20 वर्षात म्हणजे 2002-03 पासून एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. आणि सौराष्ट्र संघ 2007-08 मध्ये चॅम्पियन ठरला. यावेळी महाराष्ट्राचा संघ दोन दशकांची प्रतीक्षा संपवू शकतो कारण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्कृष्ट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाड. फायनलपूर्वी गेल्या 9 पैकी 7 सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 1000 च्या वर धावा झाल्या आहेत. या सामन्यात सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच येथे महाराष्ट्र प्रथम खेळताना दिसणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 9:00 वाजता सुरू होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स 1/HD वर थेट प्रक्षेपणासाठी उपलब्ध असेल. चाहते, ज्यांना या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहण्यात रस आहे, ते Disney+ Hotstar अॅपवर पाहु शकतात.

 

BCCI Domestic
@BCCIdomestic

Follow

Official
A look at the Saurashtra and Maharashtra’s Playing XIs 🔽 Follow the match 👉 bcci.tv/domestic/vijay #VijayHazareTrophy | #Final | #SAUvMAH | @mastercardindia

Image

67
Reply
Share

संबंधित पोस्ट

क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत विविध खेळांचे प्रशिक्षण सुरु

vishwatmaklokswamivarta

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना थोड्या वेळात सुरू होणार 

vishwatmaklokswamivarta

इजिप्तमधील जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेतून भारताची माघार, इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय…

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत शुभसाद सुपर अबॅकसचे सुयश

ग्रामीण भागात क्रीडा नैपुण्याला संधी देण्यासाठीसुविधा निर्माण करणार- क्रीडा मंत्री संजय बनसोडे