vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकाच वेळी- रावसाहेब दानवे

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकाच वेळी- रावसाहेब दानवे

नवी दिल्ली प्रतिनिधी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते  रावसाहेब दानवे  यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारण  तापण्यात आणखीच भर पडली आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही  पार पडतील, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते (BJP) रावसाहेब दानवे  यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारण तापण्यात आणखीच भर पडली आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही पार पडतील, असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेला राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

औरंगाबाद येथील फुलंब्री तालुक्यात भाजपच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमता दानवे बोलत होते. रावसाहेब दानवे हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे जोरदार चर्चेत असतात. आताही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आहेत. दानवे यांनी म्हटले आहे की, राज्यातील एकूणच राजकीय घडामोडी आणि परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या निवडणुकाही पार पडतील. तसेच, औरंगबादमधील अनेक नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असेही त्यांनी म्हटले

संबंधित पोस्ट

करोना,ची तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्‍यक असलेले नियोजन करण्यात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात सर्वांत पुढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी. 

विधानसभा निवडणूक २०२४-निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 25 जुलैपासून विस्टाडोम कोच सह; आजपासून बुकिंग सुरू

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ट्रेनर विमान कोसळले; दोन पायलट बेपत्ता