vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जल जीवन मिशन” च्या जाणीव-जागृतीसाठी लघुपट निर्मिती स्पर्धेत इच्छुकांनी सहभाग नोंदवावा,पारितोषिक प्रथम- रु.31 हजार, व्दितीय- रु.21 हजार व तृतीय- रु.11 हजार

जल जीवन मिशन” च्या जाणीव-जागृतीसाठी लघुपट निर्मिती स्पर्धेत इच्छुकांनी सहभाग नोंदवावा,पारितोषिक प्रथम- रु.31 हजार, व्दितीय- रु.21 हजार व तृतीय- रु.11 हजार

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी:- जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीकरिता जिल्हा स्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनात जिल्हा स्तरावर लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे.

 

या लघुपट स्पर्धेचे विषय 1.पाण्याचे शाश्वत स्त्रोत, 2.जल संवर्धन, 3. जल जीवन मिशन यशोगाथा, 4. पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती, 5. हर घर जल घोषित गाव विकास, 6. विविध योजनांचे कृतीसंगम, 7. पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती असे असून लघुपट स्पर्धेचे बक्षीस व पारितोषिक स्वरूप प्रथम- रु.31 हजार व पारितोषिक, व्दितीय – रु.21 हजार व पारितोषिक, तृतीय- रु.11 हजार व पारितोषिक याप्रमाणे राहील, अशी माहिती कार्यकारी अभियंता श्री.कुलकर्णी जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी दिली आहे.

 

या स्पर्धेविषयीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- जल जीवन मिशन विषयक विविध बाबींना अनुसरुन लघुपट निर्मिती स्पर्धा जिल्हा स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती ही स्वत: केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्व संगीत, गीत, चित्रीकरण हे स्वत: तयार केलेले असावे. अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभाग यांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट या स्पर्धेसाठी सादर करण्यात येवू नयेत. या स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या लघुपटाबाबतचे कॉपीराईटचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाने सादर करणे आवश्यक आहे. लघुपट निर्मितीसाठी वापरण्यात आलेले शुटिंग साहित्य व्यावसायिक व उत्तम दर्जाचे असावे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणारा नसावा.

 

लघुपट स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेले लघुपट पात्र ठरविण्याचे व निवडीचे अधिकार जिल्हास्तरीय निवड समितीचे असतील. लघुपट स्पर्धकांनी आपले लघुपट जिल्हास्तरावर दि. 29 फेब्रुवारी 2024 पूर्वी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, ठाणे येथे पेन ड्राईव्हमध्ये प्रत्यक्ष आणून अथवा nbazpthane@gmail.com या मेलवर सादर करावेत. लघपुटासोबत स्पर्धकाने आपली संक्षिप्त माहिती तसेच लघुपटाची संहिता तीन प्रतीत सादर करावी, असे जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सूवर्णसंधी

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान-मुंबई शहर जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

अल्पसंख्याक विकास विभाग:अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मान्यताराज्यातील अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर करणार

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 73 उमेदवार रिंगणात*आज 38 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे*

vishwatmaklokswamivarta