vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी एक महिन्यात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांना भेटणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी एक महिन्यात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांना भेटणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

 

राज्य प्रतिनिधी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे, या मागणीसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल याची खात्री आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत व्यक्त केला.

 

विधानसभा सदस्य जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे धोरण होते. त्यासाठीच्या प्रकल्पनिर्मितीस सहा टक्के व्याजदराने कर्जही उपलब्ध करण्यात आले. परंतु नंतरच्या काळात साखरेचे दर नियंत्रित ठेवणे आणि साखरेचा तुटवडा टाळण्यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीबाबतच्या धोरणात बदल केला. परंतु आता राज्यात आणि देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाले असल्याने ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस बंदी घालण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी अनौपचारिक चर्चा झाली असून त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर महिन्याभरात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गेल्या काही वर्षात एफआरपीमध्ये वाढ झाली. त्याच प्रमाणात एमएसपीही वाढण्याची गरज आहे. ऊसउत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताचा विचार करुन यासंदर्भात निर्णय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला

 

संबंधित पोस्ट

मुंबईत वृ्द्ध व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला खार पोलिसांकडून अटक

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी केरळ हादरले:ख्रिश्चन समाजाच्या प्रार्थना सभेत एकापाठोपाठ 5 भीषण स्फोट…

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला  : पालकमंत्री अतुल सावे,पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुल टप्पा 2 आणि जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री उन्नत ग्राम अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील ११३ गावांचा होणार कायापालट…

vishwatmaklokswamivarta

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ – शालेय शिक्षण विभागाची माहिती

भोंग्यांबाबत सुप्रीम कोर्टाचाच निर्णय संपूर्ण देशासाठी लागू असेल; Dilip Walse Patil यांनी जाहीर केला  सर्वपक्षीय बैठकीमधील निर्णय..

vishwatmaklokswamivarta