vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून अटक..

खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून अटक..

 

 

मुंबई, प्रतिनिधी : शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिन्स गोयल, वय ५३ वर्षे यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त यांनी दिली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीवर वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात कंपनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले आणि बोगस वाहतूक पावत्या जारी करत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे कंपनीने रूपये ६४.०६ कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून शासनाची फसवणूक केली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या सर्व कामकाजास व व्यवहारास जबाबदार असल्यामुळे प्रिन्स गोयल यांचा या फसवणूकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळून आहे. ही संपूर्ण कार्यवाही षण्मुगाराजन एस. (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क तसेच नयना गोंदावले, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, विलास नाईक आणि अजित विशे, सहायक राज्यकर आयुक्त यांच्याकडून संयुक्तपणे राबविण्यात आली. या कार्यवाहीत राज्यकर निरीक्षकांचे उल्लेखनीय योगदान आहे.

सन २०२४-२५ मध्ये केलेल्या या ९ व्या अटकेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कठोर इशारा देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छतेचाही एल्गार

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कॅप्टन तमिल सेल वन विजयी, रॅली द्वारे जनतेचे आभार..

vishwatmaklokswamivarta

नेरळ-माथेरान ट्रेन:पर्यटकांसाठी खुशखबर! 3 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार नेरळ-माथेरान ट्रेन