vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   दि.15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी व सहा.निवडणूक अधिकारी यांचेकरीता महापालिका मुख्यालयात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूका निष्पक्ष व बिनचूक पार पडण्याकरीता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आचारसंहिता पथक प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

  या प्रशिक्षणामध्ये नामनिर्देशनपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे, नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची कार्यवाही, छाननी प्रक्रियेची कार्यवाही, वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिध्दीची कार्यवाही, निवडणूक चिन्ह नेमून देण्याबाबतची कार्यवाही तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्दीबाबतची कार्यवाही, उमेदवारांचा निवडणूक खर्च अशा विविध बाबींवर नियमावली सांगत सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे यांनी सादरीकरणाव्दारे निवडणूक कार्यक्रमातील प्रत्येक टप्प्याची विस्तृत माहिती दिली. यावेळी विविध बाबींवर विचारलेल्या शंकाचे त्यांनी निरसनही केले.

     आठही विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये सुरु झाली असून त्या ठिकाणाहूनच निवडणूक विषयक संपूर्ण कार्यवाही होणार आहे. या कार्यालयांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी निवडणूक विषयक हेल्पडेस्क तत्परतेने सुरु करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक विषयक संपूर्ण माहिती द्यावी व आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले. विभाग अधिकारी यांनी दुबार मतदारांची तपासणी मोहीम जलद व अचूक पूर्ण करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.

  निवडणूक विषयक सर्व बाबींवर पूर्वअभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम निवडणूका सुनियोजित पध्दतीने व एकसमान रितीने पार पाडण्यासाठी उपयोगी असल्याचे मत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभात विशेष योजना:-

vishwatmaklokswamivarta

हाय सिक्युरीटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्याकरिता दि.30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीला मॉडल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे नियोजन करा– सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta