vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी करण्यावर भर- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ-वैद्यकीय शिक्षण विभाग आढावा बैठक…

शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी करण्यावर भर- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ-वैद्यकीय शिक्षण विभाग आढावा बैठक…

 

मुंबई, प्रतिनिधी : येणाऱ्या काळात प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासह नवनवीन योजना राबवित शाश्वत व चांगले कामे करण्यावर भर देण्यात येईल. तसेच सर्व शासकीय रुग्णालये सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उपसचिव अनिल आहेर, उपसचिव शंकर जाधव, उपसचिव तुषार पवार, उपसचिव श्वेतांबरी खडे, संचालक (आयुष) डॉ. रामण घोंगळकर, कोल्हापूर जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालय कागल येथील अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील व शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय, उत्तूर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सन २०२४-२५ पासून मुंबई आणि नाशिक येथे प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमतेचे आणि अंबरनाथ (जिल्हा -ठाणे), गडचिरोली, हिंगोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा, जालना आणि भंडारा या जिल्हयांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याबाबत तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजनांबाबत PSU द्वारे होणाऱ्या बांधकामाचा आढावा घेतला.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, कागल येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, आजरा येथीय उत्तूर निसर्गोपचार महाविद्यालय संदर्भात आढावा घेण्यात आला. यंत्रसामुग्री निधी वितरण व पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच 2024 – 25 मधील विविध योजनांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.0000

संबंधित पोस्ट

प्रभावी प्रशासनात नागरिकांशी सुसंवाद महत्वाचा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी   

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना,महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समितीच्या अध्यक्षपदी सतीश घाटगे

जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम…

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर शासनाची कठोर भूमिका- गृह राज्यमंत्री योगेश कदम

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या मतमोजणीसाठी वाहतुक मार्गात बदल..

vishwatmaklokswamivarta